16 वर्षीय मुलाने पबजीच्या नादात गमावले 10 लाख रुपये

नवी दिल्ली ।  पबजी गेमच्या नादात एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून तब्बल 10 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  इतकी मोठी रक्कम, पैसे ट्रान्सफर झाल्याचं समजल्यानंतर मुलगा घरातून फरार झाला. परंतु मुंबई क्राईम ब्रांचच्या मुस्कान यूनिटला मुलगा घरापासून काही अंतरावर आढळला. त्यानंतर त्याला ठाण्यात नेऊन त्याचं काउंसलिंग करण्यात आलं. मुंबई क्राईम ब्रांचने घरातून पळून गेलेल्या या मुलाला ट्रेस केलं आणि शोधून काढलं. आता त्याला कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं आहे.

 

 

मुंबईतील अंधेरी भागात राहणारा हा मुलगा होता. आई-वडिलांनी मुलगा घरातून पळून गेल्यानंतर त्याच्या जवळच्या मित्रांकडे, परिसरातील मित्रांकडे चौकशी केली. परंतु तो कुठेही सापडला नसल्याने आई-वडिलांनी अखेर पोलीस स्टेशन गाठलं. दरम्यान, याआधीही पबजी  गेमच्या नादात अनेक अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक संस्थांनी ऑनलाईन गेम बॅन करण्याची मागणीही केली होती.

You May Also Like