३५ वर्षीय सलून व्यावसायिक तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास

जळगाव : शहरातील लक्ष्मी नगर भागात एका ३५ वर्षीय सलून व्यावसायिक तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गजानन कडू वाघ रा. लक्ष्मी नगर असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

You May Also Like