दोंडाईचा येथे शेतात सापडले श्री महावीर भगवान यांचे कोरीव मुर्तीमुकूट

दोंडाईचा : शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या प्रसिद्ध रामीच्या महादेव शेजारील रामभाऊ माळी यांच्या शेतात दिगंबर माळी व मजुरांना जैन समाजाचे आराध्य दैवत श्री.महावीर भगवान यांचे दोन फुट उंचीचे कोरीव मुर्ती स्वरूप मुकूट सापडले असल्याने गाव व परिसरात वार्ता पसरल्याने रामी व दोंडाईचा येथील भक्तांनी मुर्तीमुकूट पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. तहसिलदार यांनी पंचानामा करत मुर्तीमुकूट पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्याण, दोंडाईचा शहराजवळील प्रसिद्ध महादेव मंदीराच्या बाजुला रामभाऊ माळी यांच्या मालकीच्या शेत आहे. पावसाळापुर्व मशागत करत असतांना त्यांचे भाचे दिगंबर माळी व मजुरांना पंचधातुची कोरीव नक्षीकाम असलेले मुर्तीमुकूट आढळुन आले. साधारण दोन फुट उंचीचे मुर्तीमुकूटाची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली. येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर राम माळी यांनी तत्काळ अप्पर तहसिलदार सुदाम महाजन, पो.नि दुर्गेश तिवारी, शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांनी घटनेची माहिती दिली. तर अप्पर तहसिलदार यांनी मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री यांना पाठवुन खातरजमा करून घेत पंचनामा केला. तर पंचनामा करून मुर्तीमुकूट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

You May Also Like