बकरीच्या व्यापाराला चार जणांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धरणगाव :येथील बकरीच्या व्यापाराला चार जणांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छोटू किसन धनगर (वय ४६ वर्षे, धंदा-बकरीचे व्यापार ) याने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, देवकरण बंगला खान्देश हॉटेलच्या बाजूला शहा पेट्रोल-पंपासमोर, धरणगाव ता. धरणगाव जि. जळगाव या ठिकाणी माझी पत्नी सरलाबाई, मुलगा धीरज असे एकत्र राहतो. तिथे मी २५ वर्षापासून राहतो. बकरी चा व्यापार करून आमचा उदरनिर्वाह चालवतो. दिनांक २१ जून २०१९ रोजी सकाळी ८.१० वाजता मी घरातून कामासाठी कन्या शाळेजवळ धरणगाव माझे बकरीचे शेड येथे आला आणि कामाला सुरुवात केली तेवढ्यात मो.सा. वर मो. सा. नंबर माहित नाही. दोन जण एकाचे नाव भिका धनगर दुसऱ्याचे नाव दीपक भिका धनगर असे आले आणि काही एक कारण नसताना माझ्याकडे एक लाख रुपयांची मागणी करू लागले. त्यांना विचारले की, कशाचे पैसे ते बोलले की मला आम्हाला उसनवार पैसे (एक लाख रुपये) दे. मी बोललो की माझ्याकडे पैसे नाही, ते दोन्ही बोलले की, तुझ्याकडे पैसे आहे खिशात, मी बोललो की, मला बकऱ्या घ्यायला जायचे आहे वरणगावला मी तुला पैसे कसे देऊ शकत नाही. त्यांनी लगेच आपल्या दोन्ही मुलांना एकाचे नाव विजू भिका धनगर, दुसऱ्याचे नाव मोहित भिका धनगर अशांना फोन लावून कन्या शाळेजवळ धरणगाव येथे बोलावून घेतले. त्या दोन्हींनी मला शिव्या द्यायला लागले. मी बोललो की, शिव्या देऊ नका. लगेच त्याचा भाऊ दीपक धनगर याच्या हातात तलवार होती आणि बुजू धनगर याच्या हातात कुऱ्हाड होती. लगेच त्याच्या बापाने भिका नामदेव धनगर यांनी लगेच त्याच्या मुलाला सांगितले की, हा पैसे देत नाही याला मारा. दीपक धनगर आणि माझ्या उजव्या हाताच्या करंगडीच्या मध्यभागी तलवारीने वार केला. तसेच वीज धनगर याने माझ्या डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या खाली कुर्‍हाडीने दोन वार केलेले आहेत. तसेच त्याचा भाऊ मोही त्याने मला डोक्यावर लाठीमार केला. त्यानंतर मी लागलीच चक्कर येऊन खाली पडलो. तिथे उभा असलेल्या आमच्या समाजाचा शिवाजी गोकुळ धनगर याने घरी जाऊन माझा मोठा भाऊ गुलाब किसन धनगर याला सांगितले की, तुमच्या भावाला कोणीतरी इसम मारत आहे. लगेच भाऊ गुलाब धनगर हे आले आणि मला खाटेवर बसवले व मला पाणी पाजून मला बोलले की, काय झाले त्यांना मी सर्व हकीकत सांगितली. मला उजव्या हाताला आणि डाव्या हाताला व डोक्यावर दुखापत झाली आहे. आणि मी माझ्या खिशात ठेवलेले पैसे ३ लाख ६३ हजार रुपये पाहिले असता ते मिळून आले नाही. तसेच गळ्यातील सोन्याची चेन (दोन तोड्याची अंदाजे) तसेच हातातील सोन्याचे ब्रेसलेट (साडेचार तोड्याचे) असे पैसे व सोन्याचे दागिने ते घेऊन गेले. असे फिर्यादीत म्हंटले आहे.

You May Also Like

error: Content is protected !!