भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पावसाचा मोठा अडथळा

साऊथम्पटन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पावसाचा मोठा अडथळा आला. या फायनलमधील पाच पैकी दोन दिवस पावसामुळे वाया गेले. तर उरलेल्या तीन दिवसांमध्ये पावसाचा खेळावर परिणाम झाला. पावसाच्या अडथळ्यानंतरही जी मॅच झाली आहे, त्यामध्ये दोन्ही टीमनं तोडीस तोड खेळ केला आहे. त्यामुळे पाचव्या दिवसाच्या अखेरीस ही मॅच रंगतदार अवस्थेत आहे.

पाचव्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने 2 आऊट 64 रन काढले असून भारताकडे सध्या 32 रनची आघाडी आहे. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बुधवारी राखीव दिवशी सामना खेळवण्यात येणार आहे. सहाव्या दिवशी भारताचा विजय, न्यूझीलंडचा विजय किंवा ड्रॉ या तीनपैकी कोणताही निकाल लागू शकतो.

टीम इंडियानं फायनल मॅच न गमावता ड्रॉ राखली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. या संयुक्त विजेतेपदानंतरही भारतीय टीमचं मोठं नुकसान होणार आहे. फायनल मॅच ड्रॉ झाली तर टीम इंडियाचे 122 रेटिंग पॉईंट्स असतील आणि त्यांचा दुसरा क्रमांक कायम असेल. तर न्यूझीलंडची टीम 123 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर राहील.

टेस्ट जिंकल्यास फायदा

भारताने फायनल मॅच जिंकून विजेतपद पटकावले तर टीम इंडिया 124 रेटींग पॉईंट्ससह आयसीसी टेस्ट रँकिंग (ICC Test Ranking) पहिल्या क्रमांकावर जाईल. तर न्यूझीलंडची 121 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर घसरण होईल.

You May Also Like