मनसे प्रमुख राज ठाकरेंवर कोसळला दुखाचा डोंगर

मुंबई : मनसेे प्रमुख राज ठाकरे यांचा सर्वात लाडका श्वान जेम्सचे निधन झालं आहे. मनसे प्रमुखांनी त्याला पूर्ण आदराने अखेरचा निरोप दिला आहे. जेम्स राज यांच्या कुटुंबासोबत गेल्या 12 वर्षांपासून राहत होता. जेम्सला अंतिम निरोप देण्यासाठी राज ठाकरे यांच्या मुंबई निवासस्थानी पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास जेम्सचा मृत्यू झाला. काही वेळापूर्वी परळच्या स्मशानभूमीत जेम्सवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज ठाकरे आणि मजेम्सफ ची छायाचित्रे बर्याचदा सोशल मीडियावर व्हायरल व्हायची. राज ठाकरे यांचे आपला लाडका श्वान जेम्स यांच्यावरील प्रेम या छायाचित्रांमधून बर्याचदा पाहिले जाऊ शकते. घरात पक्षाच्या बैठकीत जेम्स राज ठाकरेसमवेत बर्याच वेळा दिसायचा. राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन श्वान होती, त्यापैकी बॉन्ड आणि सीन आधीच मरण पावले आहेत. मबॉन्डफने ऑगस्ट 2015 मध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलाचा चेहरा चावला होता. त्याच्या चेहर्‍यावर झालेली जखम इतकी खोल होती की त्यांना हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करावे लागले. त्यांच्यावर डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी केली आणि तिच्या चेहर्‍यावर 65 टाके पडले होते.

सुरुवातीला जेम्स, शॉन आणि बॉन्ड ठाकरे निवासस्थानाच्या सर्वात खालच्या मजल्यावर राहत होते. राज ठाकरे बहुतेकदा त्यांच्या घराच्या गच्चीवर आपल्या श्वानांसह खेळताना दिसत असत. ते तिघांनाही आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करत असत. तिन्हीच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी एक प्रशिक्षकही ठेवलेला होता. पत्नीबरोबर झालेल्या घटनेनंतर राज यांनी त्यांच्या तिन्हीही श्वानांना कर्जत येथील फार्महाऊसवर पाठवले आणि अधुनमधून त्यांना घरी घेऊन येत असत. राज यांचे जवळचे मित्र सांगतात की ते त्याच्यापासून दूर राहू शकत नव्हते.

You May Also Like