निख्खळ आनंदाचा नवा झरा ‘दम लगा के हँसना’

दिवसभरातील तणाव विसरण्यासाठी पहाच…

मुंबई : विविध वाहिन्यांवर हास्यकल्लोळ माजविण्यार्‍या मालिकांचे सादरीकरण सुरू असतांना आजपासून निख्खळ आनंदाचा नवा झरा अर्थात ‘दम लगा के हँसना’ ही मोती सुलतानपुरी, प्रशांत श्रीवास्तव व सोनिका यादर लिखीत नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या सेवेत सादर होत आहे. मनावरी ताणतणाव विसरून आपल्या कामात नवा जोश निर्माण करण्यासाठी मनोरंजनासह हास्याचे फवारे उडविणार्‍या मालिका बघण्याकडे रसिकांचा कल वाढतो आहे. त्यातच नव्या ताकदीची ‘दम लगा के हँसना’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये नक्कीच नवचैतन्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.

‘दम लगा के हँसना’ ही मालिका दि. 17 जूलैपासून दुपारी 12.30 व सायंकाळी 6 वाजता फक्त ‘ द क्यू’ वर चॅनल नं.( टाटा स्काय 175, डीडी फ्री डिश 34, सिटी केबल 127, डिश टिव्ही 128, हॅथवे 20, डिईएन 118) आणि ओटीटी वर एमएक्स प्लेयर, झी 5, वॉचो, चिंगारी, सोनी लाईव्ह अशा अँप्सवर भोपाळच्या कलावंतांचा अष्टपैलू अभिनय एस पी प्रोडक्शन अंतर्गत ‘दम लगा के हँसना’ या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन प्रेम शर्मा, सहा.दिग्दर्शक प्रविण शर्मा, प्रोडक्शन हेड प्रिती तोमर, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी – लालू प्रजापती,  संकलन – राम पाटीदार, रंगभुषा – वेषभुषा प्रियांका चव्हाण, क्रिएटिव्ह डायरेक्टर – अमन शर्मा, ध्वनी व्यवस्था – लोकेश शर्मा, लाईटिंग – अंकीत माहेश्वरी, लाईन प्रोड्युसर – राजेश चौधरी, संतोष मिना, मार्केटींग हेड – डॉ.योगेंद्र प्रजापती, आय टी – संजय कुशवाह, ट्रान्स्पोर्टेशन – निलेश शर्मा यांनी विविध जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत.  भोपाळमधील कलावंतांनी मनमुराद आनंद देणारी मालिका दुपारी 12.30 व 6 वाजता पाहून रसिक प्रेक्षकांनी आपला आनंद व्दिगुणित करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

 

You May Also Like