मुख्यमंत्री ठाकरे अन् पंतप्रधानांच्या भेटीचा फोटो आला समोर

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाने या भेटीचा पहिला फोटो ट्वीट केला आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे ठाकरे सरकारने तातडीने यावर तोडगा काढता यावा यासाठी मोदी सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण हे आज सकाळीच मुंबईहून दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले होते. सकाळी 9 च्या सुमारास दिल्ली विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र सदनाकडे जाणार होते. पण पंतप्रधान मोदी यांच्या निवास्थानाकडे जाण्यास उशीर होत असल्यामुळे महाराष्ट्र सदनात न जाता थेट पंतप्रधानांच्या निवास्थानाकडे रवाना झाले.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकाळी 11 वाजेच्या सुमारास भेट झाली. जवळपास तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित होते आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे.

त्याचबरोबर, राज्य शासनाने केंद्र सरकारकडे जीएसटी थकीत 24 हजार 400 कोटी थकीत रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी पीएम यांच्याकडे वित्त मंत्री अजित पवार यांनी निवेदनद्वारे केली.

You May Also Like