डोमिनिकाच्या तुरुंगातून बाहेर आला मेहुल चौकसीचा फोटो

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चौकसीचा डोमिनिकाच्या तुरुंगातून पहिला फोटो समोर आला आहे. तुरुंगात असलेल्या चौकसीने आकाशी रंगाचा टीशर्ट घातलेला दिसत आहे. तसेच, त्याच्या चेहर्‍यावर भीती दिसत आहे. विशेष म्हणजे, चौकसीच्या डोळ्याला आणि हाताला दुखापत झालेली दिसत आहे.

नॅशनल सिक्योरिटी मिनिस्ट्रीने अँटीगुआ सरकारकडून मेहुल चौकसीचे नागरिकत्व आणि इतर काही गोष्टींबाबत माहिती मागवली आहे. चौकसी अवैधरित्या डोमिनिकामध्ये आला होता. आता तो आमच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी केली जाईल. सर्व माहिती मिळाल्यानंतर त्याला अँटीगुआमध्ये परत पाठवले जाईल. यापूर्वी, अँटीगुआ-बारबुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राउनने चौकसीला भारताकडे सोपवण्यास सांगितले होते. पण, डोमिनिकाने तपासानंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

डोमिनिकाच्या कॅबिनेटने मेहुल चौकसीसंबंधित प्रकरणांवर आणि तो डोमिनिकामध्ये असल्यावरही चर्चा झाली. चर्चेतून कॅबिनेटने ठरवले आहे की, चौकसीबाबत आता डोमिनिकातील न्यायालय निर्णय घेईल. चौकसीच्या वकीलाने तेथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोमेनिकामध्ये चौकसीचे वकील मार्श वेनने म्हटले की, त्याने चौकशीची तुरुंगात भेट घेतली होती. वकीलाने सांगितल्यानुसार, चौकसीने डोमिनिकामध्ये अपहरण करुन आणल्याचा आणि मारहाणीचा आरोप लावला आहे. याप्रकरणी चौकसीचा वकील याचिका दाखल करणार आहे.

 

You May Also Like