‘त्या’ व्यक्तींना करोना लसीचा एकच डोस पुरेसा

नवी दिल्ली: देशातील करोना रुग्णांचा कहर वाढतच चालला आहे.एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा जाणवत आहे. याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत आहे. दरम्यान,  देशात लसींचा तुटवडा असताना पाश्चिमात्य देशांमध्ये एक महत्त्वपूर्ण संशोधन झालं आहे. यामुळे करोना लसीकरणाची रणनीतीच बदलू शकते.

सध्या करोना लसीचे दोन डोस दिले जातात. मात्र करोनावर मात केलेल्यांना दोन डोसची गरज नाही. त्यांना केवळ एक डोस पुरेसा असल्याची माहिती पुढे आली आहे. पेन इंन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीनं याबद्दल संशोधन केलं. याबद्दलची माहिती सायन्स इम्युनॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाली. करोना विषाणूवर मात केल्यानंतर मानवी शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज दोन प्रकारच्या असतात. टी किलर सेल्स अँटिबॉडी विषाणूला संपवतात. तर दुसऱ्या अँटिबॉडीज मेमरी बी सेल्स असतात. विषाणूनं भविष्यात पुन्हा हल्ला केल्यास त्याला ओळखून प्रतिकारशक्तीला सतर्क करून विषाणूचा खात्मा करण्यासाठी किलर सेल्स तयार करण्याचं काम या अँटिबॉडीज करतात.

दरम्यान, पेन इंन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार करोनावर मात केलेल्या अमेरिकेतील अनेक व्यक्तींना लसीचा पहिला डोस दिला गेल्यानंतर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात एँटीबॉडीज तयार झाल्या. मात्र दुसऱ्या डोसला त्यांच्या शरीराकडून मिळणारा प्रतिसाद मर्यादित स्वरुपाचा होता. तर करोनाची लागण न झालेल्या व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आल्यानंतर काही दिवसांनंतर परिणाम दिसून आले. अशा प्रकारचं संशोधन याआधी इटली, इस्रायलसह अनेक देशांमध्ये करण्यात आलं आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like