एलन मस्क यांचे एक ट्विट, बिटकॉईनच्या किमतीत हजारो डॉलर्सची घसरण, नेमके काय घडलंय?

नवी दिल्ली: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क  यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यानंतर बिटकॉइनने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. मात्र, आता एलन मस्क यांनी केलेल्या एका ट्विटमुळे बिटकॉइन गडगडले असून, सर्वांत नीचांकी स्तरावर आले आहे.

टेस्ला इंक  आणि स्पेसएक्स  या दोन बड्या कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क  यांनी एक ट्विट केलं. या ट्विटनंतर बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीला मोठा फटका बसला. एलन मस्क यांच्या एका ट्विटनंतर बिटकॉईनचा मार्केटमधील भाव तब्बल १७ टक्क्यांनी घटला. गेल्या वर्षभरापासून बिटकॉईनचा भाव वाढत असताना त्यांच्यासाठी एलन मस्क यांचं ट्विट अडचणीचं ठरलं. एलन मस्क यांनी ट्विटमध्ये टेस्लाची कार खरेदी करण्यासाठी बिटकॉईनचा वापर करता येणार नाही, असं म्हटलं होतं. एलन मस्क यांच्या ट्विटपूर्वी क्रिप्टोकरन्सीचा भाव ५४ हजार ८१९ अमेरिकन डॉलर होता. तो ४५७०० अमेरिकन डॉलरवर आला.

एलन मस्क यांचं ट्विट नेमकं काय?

एलन मस्क यांनी ट्विट करत टेस्ला कंपनीच्या कार बिटकॉईनद्वारे खरेदी करता येणार नाहीत, अशी माहिती दिली. यामध्ये त्यांनी बिटकॉईन मायनिंग आणि त्यासंबंधी जीवाश्म इंधनाच्या वाढत्या वापरामुळं चिंतेत असल्याचं सांगितलं. बिटकॉईन ही चांगली संकल्पना आहे. मात्र, पर्यावरणाला नुकसान पोहोचवायला नको, असं एलन मस्क यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जगभरातील अनेक देश बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करत असले तरी, भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही. सध्याचे कायदे हे क्रिप्टोकरन्सीच्या वापरासंबंधात अपूर्ण आहेत, त्यामधील संदिग्ध गोष्टींचा सामना करण्यास ते पुरेसे नाहीत. रिझर्व्ह बँक आणि सेबी यांसारख्या नियामक मंडळांकडे क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत निश्चित असे नियम नाहीत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवता येत नाही, असे केंद्र सरकारकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे.

टेस्लाची कार आता बिटकॉइनच्या माध्यमातून खरेदी करता येणार नाही. बिटकॉइनचा वापर हा पारंपरिक इंधनांच्या व्यवहारांसाठी विशेषत: कोळशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. कोळसा हा कार्बन उत्सर्जनाचे सर्वात मोठे आणि वाईट माध्यम आहे, असे ट्विट एलन मस्क यांनी केले आहे. तसेच क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे. भविष्यातील क्रिप्टोकरन्सीचे ते एक आघाडीचे माध्यम असेल. पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची मोठी किंमत मोजून आपण त्याचा वापर करू शकत नाही, असे मस्क यांनी नमूद केले आहे.

एलन मस्क यांच्या बिटकॉइन न स्वीकारण्याच्या या निर्णयानंतर बिटकॉईनच्या किमती १७ टक्क्यांनी घसरल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील अनेक देश बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करत असले तरी, भारतात अजून त्याला परवानगी देण्यात आली नाही. सध्याचे कायदे हे क्रिप्टोकरन्सीच्या वापरासंबंधात अपूर्ण आहेत, त्यामधील संदिग्ध गोष्टींचा सामना करण्यास ते पुरेसे नाहीत. रिझर्व्ह बँक आणि सेबी यांसारख्या नियामक मंडळांकडे क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत निश्चित असे नियम नाहीत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवता येत नाही, असे केंद्र सरकारकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे.

You May Also Like