मांसाहारासह दारुवर मथुरेत पुर्णपणे बंदी; योगींचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ।  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा शहरात मांस आणि दारूविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्याचा मोठा  निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी  निर्णय जाहीर केला आहे. मथुरेतील वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाना, गोकुळ, महावन आणि बलदेव भागात मांस आणि दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच या व्यवसायाशी निगडित व्यापारी आणि कामगारांचे इतर व्यवसायात पुर्नवसन केले जाईल असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगितले.

 

 

मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, चार वर्षापूर्वी मथुरा, वृंदवन नगर यांची एक महानगरपालिका व्हावी अशी मागणी करण्यात आली होती, त्यानुसार इथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. नंतर सात पवित्र स्थळांना तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला. या पवित्र ठिकाणी दारू आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी जनतेची इच्छा होती. त्याप्रमाणे मथुरेत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्यात आहे.

You May Also Like