एक्झिट पोलनुसार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष पराभूत होण्याच्या मार्गावर

फ्रान्समध्ये झालेल्या प्रादेशिक निवडणुकांमध्ये देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष इम्यानुअल मॅक्रॉन आणि त्यांच्या विरोधक मारिन ला पेन दोघेही आघाडी घेऊ शकलेले नाहीत असं एक्झिट पोल्सच्या सुरुवातीच्या कलांवरून दिसतंय.

दोघांचीही कामगिरी अपेक्षेइतकी झालेली नाही.

मॅक्रॉन यांचा सेंट्रिस्ट पक्षाला 10 टक्के मतं अधिक मिळवेल असं भाकित करण्यात आलं होतं. या मतांमुळे त्यांना या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच सहभागी होता आलं असतं. पण त्यांना अपेक्षेएवढी मतं मिळाली नाहीत.

मारिन ला पेन यांच्या अतिउजव्या पक्षाची कामगिरी भव्यदिव्य झालेली नाही.

हे दोन्ही पक्ष फ्रान्सच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.

मॅक्रोन यांच्या पक्षाच्या खासदार ऑरोरे बर्ज यांनी आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीची वर्णन करताना, “ही आम्हा सगळ्यांसाठी लोकशाहीची चपराक आहे,” असं म्हटलंय.

ला पेन यांचा नॅशनल रॅली पार्टी हा पक्ष रविवारी, 20 जूनला झालेल्या पहिल्या फेरीत आघाडी घेऊन पहिल्या क्रमांकावर राहिल असं वाटलं होतं. हा पक्ष कमीत कमी या भागात एक तरी जागा जिंकेल असं वाटलं होतं पण तसं न होता त्यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

मारिन ला पेन स्वतः निवडणूक लढवत नव्हत्या पण त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.

या निवडणुकीत कमीत कमी मतदान होण्याचा रेकॉर्ड झाला. फक्त 34% मतदान झालं. 66 % लोकांनी मतदान केलेलं नाही. मारिन यांनी या कमी टक्केवारीचं ‘नागरी आपत्ती’ असं वर्णन केलं.

मतदान कमी होण्याचं खापर त्यांनी सरकारवर फोडलं. सरकार लोकांच्या मनात राजकीय प्रक्रियेबद्दल विश्वास निर्माण करू शकलं नाही म्हणून असं झाल्याचा आरोप त्यांनी केला.

You May Also Like