ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी कृती आराखडा तयार!

नवी दिल्ली । बीसीसीआयने कर्णधार विराट कोहलीशी चर्चा करून आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी कृती आराखडा तयार केला आहे. लॉर्ड्स येथील कसोटीदरम्यान कोहली आणि ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये याविषयी चर्चा झाल्याची माहिती  सूत्रांकडून दिली.

 

 

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला १५१ धावांनी धूळ चारली. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारताचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीगसाठी संयुक्त अरब अमिरातीला रवाना होतील. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान ‘आयपीएल’मध्ये खेळल्यानंतर आठवडाभरातच ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

 

 

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला २०१७च्या चॅम्पियन्स करंडकामध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याशिवाय जून महिन्यात झालेला जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामनासुद्धा भारताने गमावला.

You May Also Like