झिम्बाब्वेच्या ‘त्या’ क्रिकेटपटूवर होणार कारवाई? ; संघातूनही वगळणार असल्याच्या चर्चा

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा फलंदाज रायन बर्ल याने नामांकित शूजच्या स्पॉर्न्सरशिपसाठी एक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर पुमा शूज कंपनीने रायन बर्लला शूज पाठवत स्पॉर्न्सरशिपसाठी मदत केली. मात्र, यासाठी त्याला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डने बर्लविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करू शकते. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक पत्रकार ऍडम थेओ म्हणाले, की झिम्बाब्वे क्रिकेटमधील काही लोक रायनच्या ट्विटवर रागावले आहेत. पुढे त्यांनी लिहिले, ‘मला सांगितले आहे, की झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डामध्ये काही लोक रायन बर्लवर रागावले आहेत. त्यांना असे वाटते, की यामुळे क्रिकेट मंडळाच्या प्रतिमेला कलंक लागू शकतो. त्यामुळे हे सदस्य रायनवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करत आहेत. झिम्बाब्वे क्रिकेटसाठी हे खूप कठीण पाऊल असेल. बंद दाराच्या मागून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. कदाचित त्याला संघातून वगळण्यात येईल. मला आशा आहे, की मी चुकीचा सिद्ध होईन.’

बर्लने ट्विटरच्या माध्यमातून शूजसाठी प्रायोजकता मिळत नसल्याची कळकळ सोशल मीडियावर व्यक्त केली होती. . “आम्हाला प्रायोजक मिळेल का, जेणेकरून प्रत्येक मालिकेनंतर आम्हाला आमचे शूज चिकटवावे लागणार नाहीत”, असे बर्लने म्हटले होते. बर्लच्या या विनंतीनंतर पुमा कंपनीने त्याला मदतीचा हात दिला. पुमाने बर्लला स्पॉन्सरशिप दिली असून ‘‘आता शूज चिकटवायची गरज नाही”, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले.

You May Also Like