अभिनेते भूषण कडू यांच्या पत्नीचं निधन

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेते भूषण कडू यांच्या पत्नी कादंबरी कडूंच करोनामुळं निधन झालं आहे. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

छोट्या पडद्यावरील मकॉमेडी एक्प्रेसफमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले भूषण कडू हे त्यांच्या विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी ओळखले जातात. भूषण कडू हे मबिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातही सहभागी झाले होते. त्यातील फॅमिली स्पेशल भागाच्या निमित्तानं भूषण यांच्यासोबत पत्नी कादंबरी व मुलगा प्रकीर्त हे देखील बिग बॉसच्या घरात दिसले होते. कादंबरी यांच्या निधनाबद्दल मराठी मनोरंजनसृष्टीतील मान्यवर कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

करोनाचं निदान झाल्यानंतर कादंबरी यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती खालावल्यामुळं त्यांना केईएममध्ये हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही.

You May Also Like