अभिनेता रणदीप हुड्डावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई । बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. तो सतत त्याच्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा गीतकार प्रियांका शर्माने रणदीपवर केलेल्या आरोपांनंतर सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी रणदीपला कोर्टान नोटीसही बजावली आहे.

 

 

रणदीपवर प्रियांका शर्माने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणदीपवर हरयाणामधील गीतकार आणि पटकथाकार प्रियांका शर्माने फसवणुकीचा आरोप केला आहे. काही प्रोजेक्टसाठी रणदीपने होकार दिला होता. मात्र ते काम अद्याप करण्यात आले नाही असा आरोप प्रियांकाने केला आहे. त्यासोबतच इतर काही आरोप देखील प्रियांकाने केले आहेत. प्रियांकाच्या वकिलाकडून रणदीपबरोबरच त्याच्या सहकाऱ्यांना देखील कोर्टाद्वारे नोटीस पाठवली आहे.

You May Also Like