अभिनेत्री कंगनाने भाजपच्या पश्चिम बंगालमधील पराभवाची तुलना केली काश्मीरशी

मुंबई : पश्चिम बंगालच्या निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पार्टीचा विजय झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री  कंगनाने निवडणूकींच्या निकालानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमूधन ममत बॅनर्जी यांचा पक्ष जिंकल्याचा राग तिने व्यक्त केला आहे. या आधीही अनेक वेळा कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. चालू घडामोडीवर ती नेहमीच आपले मत मांडत असते.

दरम्यान, तिन केलेल्या ट्विटमध्ये ‘बांग्लादेशी आणि रोहिंगे हे ममता यांची मोठी ताकद आहे. ज्या प्रकारची प्रवृत्ती समोर येत आहे त्यातून असे दिसून येत आहे की, तिथे हिंदूंची संख्या फार कमी आहे. आकड्यांनुसार बंगाली मुसलमान संपूर्ण भारतात सर्वात गरीब आणि वंचित आहेत, चांगले आहे आणखी एक काश्मीर तयार होत आहे’, असे म्हणून कंगनाने थेट काश्मीरशी तुलना केली आहे.

तसेच, ‘२०१६ मध्ये भाजपने बंगालमध्ये ३ जागा जिंकल्या होत्या. आता NRC आणि CAA ची गरज आहे. बंगालमध्ये अंल्पसंख्यांक आता बहुसंख्यांक झाले आहेत. ज्या प्रकारे मोदी आणि अमित शहा यांनी उत्कटtतेने आणि समर्पण पद्धतीने काम केले आहे त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. पुढील काळात बंगालमध्ये होणाऱ्या ब्लड बाथसाठी डोळे बंद करणे कठीण होणार आहे. आतापर्यंत अनेक जण मेले आहेत. मात्र पराभवाच्या भितीने त्यांना सापडलेली नवीन शक्तीमुळे अधिक रक्ताची तहान लागले, तिच त्यांना सामर्थ्यवान बनवेल’, असेही कंगनाने म्हटले आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like