अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला स्थलांतरित

पुणे । मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं आपलं मुख्य कार्यालय आता मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधून निर्णय गतीने घेण्यास मदत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. १३ जुलैला अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. त्यानंतर आता मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवलं जाणार आहे.

 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं आपलं मुख्य कार्यालय आता मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

“अदानी ग्रुप एअरपोर्ट सेक्टरमध्ये गतीने पुढे जात आहे. अशात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आपलं मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.” असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे आरके जैन यांना सीईओ एअरपोर्ट अशी जबाबदारी दिली आहे. जैन सुरुवातीपासून कंपनीसोबत काम करत होते. त्याचबरोबर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा ताबा मिळवण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

You May Also Like