आदितीच्या जिगरबाज खेळीनं घडवला ‘हा’ इतिहास!

टोक्यो।  ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोकच्या रुपानं गोल्फ प्रकारात भारताला पदक जिंकण्याची आशा निर्माण झाली होती. तिसऱ्या राऊंडपर्यंत आदिती तमान भारतीयांच्या अपेक्षेला अगदी तंतोतंत उतरली. मात्र, मध्येच खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला खेळ पुन्हा सुरू झाला आणि आदिती तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली. त्यामुळे ७२ होल्सच्या खेळानंतर आदितीला अशोकला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

 

 

मात्र, अस जरी असलं, तरी पहिल्या तीन राऊंड्समध्ये आदिती दुसऱ्या स्थानावर कायम होती. आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोल्फपटूला ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही. आदितीच्या या कामगिरीवर यामध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये अग्रस्थानावर असणाऱ्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकावर नाव कोरलं, तर न्यूझीलंडच्या लिडिओ कोनं ब्राँझ मेडल जिंकलं.

You May Also Like