कौतुकास्पद! कोळ्याच्या प्रजातीला शहीद वीर तुकाराम ओंबळे यांचं नाव

मुंबई : महाराष्ट्रात कोळ्यांना दोन नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. यापैकी एका प्रजातीला शहीद पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांचं नाव देण्यात आलं आहे. या प्रजातींच्या संशोधकांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

संशोधक धृव प्रजापती यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. एका प्रजातीला शहीद तुकाराम ओंबळे यांचं नाव आहे तर दुसर्‍या प्रजातीला धृव यांचे मित्र कमलेश चोळके यांच्या स्मरणार्थ पिन्हीटेल्ला चोल्की असं नाव देण्यात आलं. शहीद ओंबळे यांच्या शौर्याची, बलिदानाची आठवण म्हणून त्यांचं नाव प्रजातीला देण्यात आल्याचं धृव यांनी सांगितलं आहे.

धृव म्हणाले कि, महाराष्ट्रात कोळ्यांच्या दोन नव्या प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यापैकी एक प्रजाती शहीद तुकाराम ओंबळे यांना समर्पित करत आहे. त्यांनी स्वतःच्या अंगावर 23 गोळ्या झेलत दहशतवादी कसाबला जिवंत पकडलं.

दरम्याण, त्यांनी या ट्विटसोबत या प्रजातीचा आणि शहीद ओंबळे यांचा फोटोही शेअर केला आहे. 2008 सालच्या 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुंबई पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी गौरवशाली कामगिरी केली. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दहशतवादी कसाबला जिवंत पकडलं. शहीद ओंबळे यांच्या गौरवशाली कामगिरीमुळे त्यांना मरणोत्तर अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like