अमेरिकेकडून भारतात वैद्यकीय मदत दाखल

नवी दिल्ली :करोनाची दुसरी लाट देशाला अत्यंत गंभीर ठरली असून, दरदिवशी वाढणारी रुग्ण संख्या आणि मृतांची संख्या हि चिंतेत टाकणारी आहे. तसेच,  बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी सकाळी अमेरिकेतून भारतात विमान दाखल झाले असून यामध्ये करोनासोबत लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे.

वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या हवाई दलाचे सुपर गॅलॅक्सी विमान शुक्रवारी सकाळी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य आणि १० लाख रॅपिट कोरोना टेस्ट किट पाठवण्यात आले आहे. याचबरोबर, भारतातील अमेरिकी दुतावासाने ट्विट केले आहे. यामध्ये विमानाचा फोटो शेअर केले आहेत. तसेच, म्हटले आहे की, “अमेरिकेतून आणीबाणीच्या कोविड संकटाशी लढण्यासाठी मदतीची पहिली खेप भारतात आली आहे. ७० वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत असून करोना संकटाशी लढा देण्यासाठी अमेरिका खंबीरपणे भारतासोबत आहे”.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like