लस उत्पादक कंपन्यांचा सल्ला; ‘या’ व्यक्तींनी करोना लस घेऊ नका

नवी दिल्ली:  देशातील वाढती करोना रुग्णांची संख्या ही अतिशय चिंतादायक होत चालली आहे. अक्षरशा: रुग्णांना आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कारणाने कित्येक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता केंद्र सरकारने 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाईल असा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर 1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. 28 एप्रिलपासून कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपमार्फत यासाठी नोंदणी सुरू होईल.तुम्हीसुद्धा कोरोना लस घेण्याच्या तयारीत आहात. पण तरी थोडीफार भीती तुमच्या मनात आहेत. कारण कोरोना लशीचे दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने आपापल्या कोरोना लशीबाबत फॅक्टशीट जारी केले आहेत.  कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन कोरोना लस कुणी घेऊ नये, हे संबंधित लस उत्पादक कंपन्यांनी या फॅक्टशीटमध्ये सांगितलं आहे.

  • भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये सांगितलं की ज्यांना कोरोना लशीतील घटकांपासून अॅलर्जी असेल त्यांनी कोवॅक्सिन लस घेऊ नये.
  • लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर भरपूर ताप किंवा घातक संसर्ग होत असेल तर कोरोना लस घेऊ नका, असं आवाहन भारत बायोटेकने सांगितलं.
  • गर्भवती महिलांनीही कोरोना लस घेऊ नये, असा सल्ला भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने दिला आहे.
  • ज्या महिला ब्रेस्टफिडिंग करत आहेत, त्यांनीसुद्धा कोरोना लस घेऊ नये, असं या दोन्ही कंपनीने म्हटलं आहे.

दरम्यान, अशा महिलांना लस घ्यायची असेल तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  तुम्हाला तीव्र ताप असेल, अॅलर्जी असेल किंवा इतर कोणती लस घेतली असेल तर त्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्याला द्यायला हवी.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like