CBSE नंतर आता ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट आली आहे.आणि हि परिस्थीत अवाक्या बाहेरची असल्याने या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे. याआधी बोर्डाकडून दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, आयसीएसईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसंच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे.

शाळांना अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन क्लासेसाठी टाइमटेबल आखण्यासही सांगण्यात आलं आहे.सीबीएसईकडून ४ मे ते ७ जून या कालावधीत दहावीची, ४ मे ते १४ जून या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच,दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे निकष सीबीएसईकडून जाहीर करण्यात येणार आहेत. राज्यातील राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीबीएसईच्या परीक्षांबाबतही पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात येत होती.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like