महाराष्ट्रानंतर गोव्यात पावसाचे तांडव; अनेक घरं पाण्याखाली

 ४० वर्षानंतर पहिल्यांदा गोव्यात आपत्ती; जिवीतहानी नाही 

 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, “राज्यात पहिल्यांदाच या प्रकारचा पूर आला आहे. मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊनही कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु दक्षिण गोव्यातील धारबंदोरा येथे एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय आहे, असे ते म्हणाले. “गोव्यात मुसळधार पाऊस पडला आहे. हा पूर्वीसारखा पाऊस नाही. लोकांच्या घरांचे आणि शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,” असे सावंत यांनी शुक्रवारी सांगितले.

You May Also Like