PM मोदींनंतर अमित शहा देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर…

 

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुणे आणि मुंबई येथे भेट दिली तर गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

भारताचे गृह आणि सहकार मंत्री अमित शहा जागतिक योग दिनी म्हणजे २१ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या गुरुपीठ येथे येणार आहेत. गृहमंत्री शाह यांचे हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ यावेळी होणार आहे.

श्री स्वामी समर्थ गुरूपीठात रुग्णालयाच्या पायाभरणीसाठी मंगळवारी (दि.२१) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वर येथे येत आहेत. दरम्यान याच दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी येतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासन सज्ज झाले असून सुरक्षा व्यवस्थेची जय्यत तयारी सुरू आहे. केंद्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक सरकारी विभागांशी संबंधित ठिकाणांचा आढावा घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like