नाशिकमधील दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नाशिक : राज्यात करोना स्थिती गंभीर असून रुग्णांना आरोग्य सेवेंचा तुटवडा जाणतो आहे,प्रामुख्याने ऑक्सिजन चा खूप मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडेकाल नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून झालेल्या गळतीमुळे २९ रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गळतीमुळे रुग्णालयात दाखल व्हेंटिलेटरवरील रुग्णांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा न झाल्यान त्यांना आपला जीव गमवावा लागला. नाशिकच्या या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठा निर्णयग घेतला असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली.

तसेच, मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये जाण्याची परवानगी कोणालाही देऊ नका असा आदेश रुग्णालयांना देण्यात आला असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. १० मीटर दूरपर्यंत जाळ्या लावा. तसंच तिथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा, एकदा जाऊन सर्व सुरळीत आहे की नाही याची काळजी घ्या असं सांगितलं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या की, लिक्विड ऑक्सिजनसाठी यंत्रणा आणखी सुसज्ज करतोय सांगताना किशोरी पेडणेकर यांनी कोविड सेंटर उभं करतानाच आपण सुरक्षेच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली होती अशी माहिती दिली. “आपण सगळ्यांचं ऑडिट करत आहोत. खासगी रुग्णालयात असणाऱ्या बेड्सच तसंच येणाऱ्या प्रत्येत गोष्टींचं रुग्णालयाचं ऑडिट होत आहे. ऑडिट आणि सुरक्षा एकत्र सुरु आहे,”

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like