चीनमधील खाण, कामगारांचा मृत्यूनतंर पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष

पुणे : चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून करोनाची उत्पत्ती झाल्याचे दावे अनेक देश करत आहेत. त्याबाबत अद्यापही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. चीनमध्ये 2012 मध्ये घडलेला एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. यासाठी पुण्यातील एक दांपत्य कारणीभूत ठरलं आहे. या घटनेचा करोनाच्या उत्पत्तीशी संबंध जोडला जात असून त्यांनी याचा शोध घेण्यामागची कारणं देखील उलगडली आहेत.

पुण्यात राहणारं वैज्ञानिक दांपत्य डॉ. मोनाली राहलकर आणि डॉ. राहुल बाहुलीकर यांनी करोनाच्या उत्पन्नीचं कारण शोधण्यासाठी खोलपपर्यंत जाण्याचं ठरवलं. या व्हायरसची सुरुवात कशी झाली यासाठी आम्ही उत्सुक होतो. करोनाशी संलग्न असणार्‍या इतर व्हायरसचा शोध घेण्याची सुरुवात केली, असं त्यांनी सांगितलं आहे.

चीनमधील मोजियांग येथील खाण आणि ते सहा कर्मचारी शोध सुरु असतानाच दक्षिण चीनमध्ये मोजियांग येथे वापरात नसलेल्या तांब्याच्या खाणीची काही कागदपत्रं त्यांच्या हाती लागली. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, 2012 मध्ये सहा कर्मचार्‍यांना स्वच्छतेसाठी खाणीमध्ये अंडरग्राऊंड पाठवण्यात आलं होतं. या खाणीत मोठ्या प्रमाणात वटवाघुळांचा संचार होता. यानंतर हे सहा कर्मचारी गंभीर आजारी पडले होते. यावेळी करोना रुग्णांमध्ये दिसणारी ताप, खोकला, रक्ताच्या गुठल्या अशी लक्षणं त्यांच्यात दिसत होती. याशिवाय थकवा, फुफ्फुसातील न्यूमोनिया ही लक्षणंही जाणवत होती. डॉक्टर मोनाली यांनी काही कर्मचार्‍यांच्या फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. या सहापैकी तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

डॉक्टर मोनाली यांनी सांगितल्यानुसार, जगभरातील करोना रुग्णांचे रेडिओलॉजिकल रिपोर्ट पाहिले असता मोजियांगमधील खाण कामगारांशी अत्यंत मिळते जुळते असल्याचं लक्षात येतं. सीटी स्कॅनलमध्येही हा साधर्म्यपणा जाणवत आहे. मे 2020 मध्ये आम्ही यासंबंधी पेपर प्रसिद्ध केला होता. यानंतर ‘ढहशडशशज्ञशी’ या ट्विटर युजरने आमच्याशी संपर्क साधला. त्यानेही शोध घेतला असता याच गोष्टी समोर आल्या होता. मोजियांगच्या खाणीमधील कामगारांना जाणवणार्‍या लक्षणांची माहिती असणारा प्रबंध त्याने आमच्यासोबत शेअर केला, अशी माहिती डॉक्टर मोनाली यांनी दिली आहे.

You May Also Like