तीन महिन्यानतंर सोन्याच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासुन सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत होत्या, त्यानंतर आज या वाढीला ब्रेक लागला आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीत आज घसरण पाहायला मिळाली. तर चांदीचे दर देखील सलग तिसर्‍या दिवशी कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमजोरीच्या संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर उतरले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची वायदे किंमत 0.32 टक्क्यांनी घसरल्यानंतर दर 48,520 रुपये प्रति तोळा या स्तरावर आले आहे. तर चांदीमध्ये 0.4 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर दर 72,073 रुपये प्रति किलो झाले आहेत.

24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 50830 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये 50160 रुपये प्रति तोळा, मुंबईत 47000 रुपये प्रति तोळा आणि कोलकातामध्ये या शुद्धतेच्या सोन्याच्या दर 50470 रुपये प्रति तोळा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर याठिकाणी सोन्याच्या व्यवहारात तेजी पाहायला मिळते आहे. अमेरिकेत सोन्याचे दर 11.26 डॉलरच्या तेजीनंतर 1,876.33 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 0.15 डॉलरच्या तेजीनंतर 27.74 डॉलरच्या स्तरावर आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 97 रुपये प्रति तोळाने उतरले होते. या घसरणीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर कमी होऊन 47,853 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीच्या दरात बुधवारी 1,417 रुपयांची घसरण झाली होती, त्यानंतर दर प्रति किलो 71,915 रुपयांवर होते.

You May Also Like