दोन वर्षांच्या मेहनतीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक

दोन वर्षांच्या मेहनतीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक देणाऱ्या टीम इंडियासाठी २३ जून हा दिवस अपयशाचा राहिला. न्यूझीलंड संघानं ८ विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केलं अन् पहिल्या वहिल्या WTC स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. WTC Final नंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि तत्पूर्वी संघातील सर्वात अनुभवी जलदगती गोलंदाज इशांत शर्मा हा दुखापतग्रस्त झाला आहे. इशांतच्या उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून त्यावर टाके लावावे लागले आहेत.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंड विजयासमीप होता तेव्हा गोलंदाजी करताना इशांतला ही दुखापत झाली. रॉस टेलरनं मारलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात इशांतच्या बोटांना ईजा झाली आणि षटक पूर्ण न करता तो पेव्हेलियनला गेला होता. जसप्रीत बुमराहनं त्याचं षटक पूर्ण केलं. इशांतनं या सामन्यात ३१.२ षटकांत ३ विकेट्स घेतल्या.

You May Also Like