आक्रमक पवित्रा; भारत चीन सीमेवर तैनात केले 50 हजार सैनिक

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत चीनच्या सीमेजवळील तीन वेगवेगळ्या भागात भारताने सैन्य आणि फायटर विमाने तैनात करण्यात आली आहेत. सध्या चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण दोन लाखांच्या वर सैन्य सीमेवर तैनात करण्यात आलं आहे. गेल्या वर्षापासून लडाख सीमेजवळील सुरु असलेल्या चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भारताने कमीतकमी 50,000 अतिरिक्त सैनिक सीमेवर तैनात केले आहे.

चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे दोन लाख सैनिक तैनात करण्यात आलं आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्के जास्त आहे. मात्र भारतीय लष्कराच्या आणि पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) प्रवक्त्यांनी यासंदर्भातील कोणतीही माहिती दिलेली नाही. यासोबत भारतीय हवाई दलाची विमानेही सीमेवर सज्ज करण्यात आली आहेत. ही लढाऊ विमाने चीनला लागून असलेल्या तीन भागांमध्ये तैनात आहेत.

भारताच्या धोरणात बदल
1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यात दोन युद्धे झाली होती. 1974 पासून काश्मिर हा दोन्ही देशांमधील अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने भारताने धोरणात्मक दृष्टिकोनातून पाकिस्तानला अधिक महत्त्व दिले. गेल्या वर्षी 15 जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबतचे प्रकरण शांत ठेवत चीनच्या सीमेवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

आक्रमक संरक्षण धोरण
यापूर्वीही सीमेवर चिनी अतिक्रमण रोखण्यासाठी भारताने सैन्य तैनात केले होते, पण आता सैन्यात वाढ करून आक्रमण रोखण्याची आणि चीनच्या सीमेत प्रवेश करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. भारत यापुढे चीनविरूद्ध आक्रमक संरक्षण धोरण अवलंबण्यास मागेपुढे पाहणार नाही असे सूत्रांनी म्हटले आहे.

 

You May Also Like