अजय जडेजाने केली मोठी चुक; अन् भरला 5000 रूपयांचा दंड!

गोवा : भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाला गोव्यातील एका गावात कचरा टाकल्याबद्दल 5000 रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. उत्तर गोव्यातील अल्डोना या नयनरम्य गावात जडेजाचा बंगला आहे. या गावातील सरपंच तृप्ती बांदोडकर यांनी जडेजाला हा दंड आकारला. 90च्या दशकातील लोकप्रिय क्रिकेटपटू म्हणून नाव कमावलेल्या जडेजाने हा दंड भरला आहे.

भविष्यात आम्ही त्यांना गावात कचरा टाकू नका, असे सांगितले असता, ते दंड भरण्यास तयार झाले. त्यांनी दंड भरला. आम्हाला अभिमान आहे, की असे व्यक्तिमत्व, एक लोकप्रिय क्रिकेट खेळाडू, आमच्या गावात राहतात, परंतु अशा लोकांनी या गोष्टींचे पालन केले पाहिजे, असेही तृप्ती बांदोडकर यांनी सांगितले.

सरपंच बांदोडकर म्हणाल्या, गावात कचर्याच्या प्रश्नामुळे आम्ही त्रस्त आहोत. बाहेरून कचरा गावात टाकला जातो, म्हणून आम्ही काही तरुणांना कचरा पिशव्या गोळा करण्यासाठी आणि दोषींना ओळखण्यासाठी नेमले आहे. आम्हाला एका कचरा पिशवीत अजय जडेजाच्या नावाचे बिल सापडले.

You May Also Like