सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार मुंबई, ठाणे क्षेत्रातील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने

मुंबई :  देशासह राज्यभरात  करोना परिस्थिती आता हाताबाहेरची झाली आहे.  दरम्यान, करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला तसेच,  प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब व गरजू शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी 8.00 ते रात्री 8.00 यावेळेत सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जेणेकरुन अधिकृत शिधावाटप दुकानात एकाचवेळी गर्दी होणार नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील  पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहावे लागू नये यासाठी आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत सर्व यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत.

यासाठी मुंबई आणि ठाणे शिधावाटप यंत्रेणतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील  सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या https://mahaepos.gov.in  या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. याबाबत तक्रार असल्यास खालील हेल्पलाईन क्रमांक तसेच ई-मेल क्रमांक यावर तक्रार नोंदवावी.

दरम्यान, अधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून देय असलेले अन्नधान्य न दिल्यास त्याचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. असे आवाहन याद्वारे करण्यात येत असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कैलास पगारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like