मोठी बातमी,विद्यापीठांच्या सर्व परिक्षा ऑनलाईन घेणार : उदय सामंत

मुंबई: राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाईन परीक्षा घेणं अशक्य आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असं उदय सामंत म्हणाले. प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा झाली. प्राध्यापक भरती करायची आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल. प्राध्यापक भरती होणारच नाही, अशा ज्या चर्चा सुरु आहेत त्यावर विश्वास ठेवू नये, असं उदय सामंत म्हणाले.

तसेच, ऑनलाईन परीक्षेसाठी यंत्रणा उभारणार असून, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीदेखील सामंत यांनी दिली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन त्यांना प्रमाणपत्रं मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं त्यांच्या भवितव्यातील शिक्षणात अडचणी येणार नाही, त्याला प्राधान्य असेल असंही सामंत यांनी म्हटलं आहे.

उच्च शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत गणले जावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच विधी विभागाच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार असल्याची माहितीही उदय सामंत यांनी यावेळी दिली. प्राध्यापक भरतीबाबतही चर्चा झाली असून ती होणारच आहे, मात्र कोविडचं संकट कमी झाल्यानंतर नवी प्राध्यापक भरती होईल, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणाले.

दरम्यान, राज्यातील 37 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा मनोदय यावेळी उदय सामंत यांनी बोलून दाखवला. 18 ते 25 वयोगटातील या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी विद्यापीठांच्या मार्फत यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामंत म्हणाले. तसं झाल्यास लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळणं शक्य होईल असंही सामंत यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना लस मोफत देण्याबाबतचा निर्णय मात्र मुख्यमंत्रीच घेऊ शकतील असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like

error: Content is protected !!