मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे उद्या कार्यान्वित होणार

मुंबई : संपूर्ण देशात करोनाने थैमान घातला आहे, परिस्थिति आता हाताबाहेर गेलीय. दरम्यान, राज्यातील वाढत्या करोना संख्येमुळे रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिविर इंजकेश्नसह लस तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुंबईत कोविशिल्ड लसींचे दीड लाख डोस उपलब्ध झाले असल्याचं मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं. उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र कोवॅक्सिन ही लस ठराविक केंद्रांवर फक्त दुसऱा डोस घेणाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. त्याचा साठा मर्यादित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी मुंबईत ७ खासगी रुग्णालये, ३० सरकारी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रे अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरु असल्याची माहिती दिली. त्यांनी पुढे लोकांना आधी चौकशी करुन मगच लस घेण्यासाठी जाण्याचं आवाहनही केलं आहे. लसींचा साठा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत असल्याने त्यांनी हे आवाहन केलं आहे. आधी चौकशी करुन लसीकरण केंद्रावर गेल्यास त्यांची केंद्रावर जाऊन होणारी धावपण टाळता येईल असंही त्या म्हणाल्या.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like