श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र करण्यात आलेले सर्व आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत फेटाळले आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या टीकेला उत्तर सडेतोड दिले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. ‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे.

सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे.
ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!

You May Also Like