बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप

पुणे : बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यातील घरांच्या तोडफोडीला मोठा विरोध केला आहे. आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी प्रशासनासमोर गयावया केली. पण प्रशासनाने कुणाचीही बाजू न ऐकता आपली कारवाई सुरुच ठेवली. याचदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत होता. सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी कशी कारवाई केली, याची माहिती देताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. बोलतो बोलता तो धायमोकलून रडायला लागला.

आमची घरं तोडण्याचं काम सुरु, आमच्या माणसांना पोलिस मारतायत, आम्ही कुठे जायचं?

“आमची घरं तोडण्याचं काम सुरु आहे. आमच्या माणसांना पोलिस मारतायत. आम्ही कुठे जायचं…. जी माणसं आमची बाजू पोलिसांसमोर-अधिकाऱ्यांसमोर मांडत होती… त्या माणसांना पोलिसांनी मारलंय.. त्यांना पोलीस चौकीला घेऊन गेलेत… अशा परिस्थितीत आम्ही कुठं जायचं नेमकं… असा आर्त सवाल चिमुकल्याने विचारला.

चिमुकल्याला अश्रू अनावर…

“ज्यावेळी कारवाईला सुरुवात झाली, त्यावेशी आमचे फडके काका म्हणून आहेत त्यांचा बीपी वाढला… त्यांना दवाखान्यात अॅडमिट केलंय… आमच्या इथली लोकं कुणी दत्तनगरला गेलंय… कुणी चंदननगरला गेलंय… माझे सगळे मित्र इथून गेलेत… आता इथं कुणीच नाही… खाली जाऊन बघितलं की सगळी घरं तोडलीत… आम्ही आता जायचं कुठं? असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल चिमुकल्याने प्रशासनाला केला.

You May Also Like