आकाशगंगेच्या केंद्राचा अद्भूत फोटो, पहिल्यांचा समोर आला असा नजारा…

नवी दिल्ली : अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने आपल्या आकाशगंगा मिल्की वे चा एक फारच सुंदर आणि अंतराळातील ऊर्जेचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिल्की वे डाउनटाऊनचा आहे. आकाशगंगेतील अशी जागा जी याच्या केंद्रात आहे. इथे बर्‍याच खगोलीय हालचाली घडत असतात.

गेल्या दोन दशकांपासून पृथ्वीच्या फेर्‍या मारत असलेल्या चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी द्वारा करण्यात आलेल्या 370 ऑब्जर्वेशनचा परिणाम आहे. याने मिल्की वेच्या केंद्रात अब्जो तारे आणि ब्लॅक होल्सचे फोटो काढले. ज्यानंतर हा फोटो समोर आला. या फोटोच्या कंस्ट्रास्टसाठी दक्षिण आफ्रिकेतील एका रेडीओ टेलिस्कोपनेही योगदान दिलं आहे.

यूनिव्हर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्स एमहर्स्टचे संशोधक डॅनिअल वांग शुक्रवारी म्हणाले की, त्यांनी महामारी दरम्यान घरी राहताना हे काम करण्यात एक वर्ष घालवलं. वांग यांनी ई-मेलच्या माध्यमातून सांगितलं की, या फोटोत आपण जे बघतो आहोत ती आपल्या आकाशगंगच्या डाऊनटाऊनमध्ये होत असलेली हिंसक किंवा ऊर्जावान इकोसिस्टीम आहे.

आकाशगंगेच्या केंद्रात बरेच सुपरनोवा अवशेष, ब्लॅक होल्स आणि न्यूट्रॉन तारे आहेत. प्रत्येक एक्स-रे किंवा बिंदू किंवा विशेषता एक ऊर्जावान स्त्रोताचं प्रतिनिधित्व करतो. ज्यातील जास्तीत जास्त केंद्रात आहेत. वांग यांनी याचा हा रिपोर्ट रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या मॅगझिनच्या जूनच्या अंकात प्रकाशित केला जाणार आहे. चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरीला 1999 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. तो आता पृथ्वीच्या फेर्‍या मारत आहे. असे डॅनिअल वांग यांनी सांगितलंय.

You May Also Like