मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ असं या आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. शिवाय संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन झैदी यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.
संजय, आलिया भट्ट आणि हुसेन झैदी यांना त्यांचं मत मांडण्यासाठी येत्या ७ जानेवारी २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गंगुबाईच्या कुटुंबीयांमुळे उद्भवलेल्या या नव्या वादामुळे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आलं आहे.
गंगूबाई काठियावाडी हे पात्रं भन्साळींना हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून भेटलं आहे. गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमात पडून विवाह केला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५०० रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकललं. कामाठीपुरातच वेश्या व्यवसाय करत असताना गंगूबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लाला यांच्याशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधली. आपल्या या बहिणीला मग करीम लालाने अवघा कामाठीपुराच हातात दिला, असे सांगितले जाते.
दरम्यान,गंगूबाईंनी हा व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नाही. उलट, मुंबईतून वेश्या व्यवसायच काढून टाकण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाचे नेतृत्वही गंगूबाईंनी केले होते. अशा गंगूबाईंची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे.
ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा…
आमच्या व्हॉटस्अॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा…