एअर इंडियाच्या विमानात दिसलं वटवाघूळ, विमानाचे इमर्जन्सी लँड

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका विमानाला दिल्ली विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काहीच वेळात माघारी परतावं लागलं. यात वैमानिकानं एअर ट्राफिक कंट्रोलकडे विमानात वटवाघूळ असल्याची तक्रार केली. या घटनेनंतर तत्काळ विमानाचं दिल्ली विमानतळावर लँडिंग करण्यात आलं. डीजीसीए अधिकार्‍यांनी सांगितलं, की विमानात धूर पसरवून नंतर मृत वटवाघूळाला बाहेर काढण्यात आलं. विमानन कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं, की याबाबत इंजिनिअरिंग टीमला विस्तृत रिपोर्ट मागितला गेला आहे.

दरम्याण, एअर इंडियाच्या अधिकार्‍यानं एएनआयसोबत बातचीत करताना सांगितलं, की -ख-105 ऊएङ-एथठ या विमानासाठी लोकल स्टँडबाय इमर्जंसी घोषित करण्यात आली आणि विमान दिल्ली विमानतळावर पुन्हा लँड करण्यात आलं. विमान माघारी आल्यानंतर माहिती मिळाली, की क्रू मेंबर्सला विमानतळावर वटवाघूळ दिसलं होतं. यानंतर त्याला विमानातून बाहेर काढण्यासाठी वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांना बोलावण्यात आलं. एअर इंडियाच्या या विमानानं पहाटे 2:20 ला अमेरिकेसाठी उड्डाण केलं. विमानानं उड्डाण करुन अर्धा तासही झाला नव्हता. मात्र, तितक्यात क्रू मेंबर्सला विमानात एका वटवाघूळ दिसलं. यानंतर वैमानिकानं हे विमान तात्काळ दिल्ली विमानतळावर माघारी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

You May Also Like