अमिताभ बच्चन नावाच्या अँग्री यंग मॅनचा बॉलीवूडमध्ये सिक्‍का चालला

अमिताभ बच्चन नावाच्या अँग्री यंग मॅनचा बॉलीवूडमध्ये सिक्‍का चालला. त्याला अनेक चित्रपट कारणीभूत आहेत.

शोलेतही ते होते. मात्र या चित्रपटात त्यांचा रोल थोडा समंजस माणसाचा होता. हटके होता. पण खऱ्या अर्थात अँग्री अमिताभ दिसले ते अगोदर जंजीर आणि नंतर दिवार, त्रिशूल आणि काला पत्थरमध्ये.

सामंत नावाच्या हप्तावसुली करणाऱ्या गुंडाच्या चमच्यांना ते स्वत: गोडाऊनचे दार बंद करून मारतात आणि नंतर नळाखाली जाऊन बसतात हा शॉट लोकांना आता धर्मग्रंथासारखा माहीत झाला आहे. दिवारमध्ये बच्चन यांनी निळा शर्ट आणि खाकी पॅंट घातली होती. तसेच त्यांच्या खांद्यावर मोठा दोर असायचा.

मात्र या त्यांच्या कपड्यांचे वैशिष्ट्‌य म्हणजे त्यांच्या शर्टला त्यांनी पुढून गाठ मारली होती. तेव्हा आणि नंतरही बच्चन यांची नवी स्टाइल यामुळे लोकांनी त्याची फार चिकित्सा केली नाही. मात्र, शर्टाला गाठ मारण्याची ती स्टाइल होती की अन्य काही याचा खुलासा आता इतक्‍या वर्षांनी स्वत: बच्चन यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शूटिंग होते. सगळी तयारी झाली होती. कॅमेरा, रोल सगळे सज्ज होते.

त्यांना तो शर्ट घालायचा होता. मात्र शर्ट बराच लांब झाला होता. गुडघ्यापर्यंत येत होता. आता ऐनवेळी करायचे काय? त्यामुळे ती गाठ बांधण्यात आली आणि शूटिंग सुरू झाले. ती केवळ टेलरची चूक होती, बाकी काही नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.

बच्चन यांच्या या लूकची कॉपी नंतर बऱ्याच चित्रपटांत बऱ्याच नायकांनी केली. मात्र दिवारमधला तो विजय आणि त्याच्या नजरेतील ती आग कोणाला दाखवता आली नाही.

You May Also Like