काश्मीरमधील धरण परिसरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

श्रीनगर ।  काश्मीरच्या कठुआ जवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. कठुआतील रणजीत सागर धरणात हेलिकॉप्टर कोसळलं. सध्या मदतकार्य सुरू असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घटना घडली आहे.

 

दरम्यान, धरणात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं. प्राप्त माहितीनुसार, सकाळी १० वाजून २० मिनिटांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं. हेलिकॉप्टर धरण परिसरात कमी उंचीवर घिरट्या घालत होतं. त्याचवेळी ते धरणात कोसळलं.

You May Also Like

error: Content is protected !!