निवडणूक आयोगानं घेतला महत्त्वाचा निर्णय ;मद्रास उच्च न्यायालयानं केली होती कानउघडणी

नवी दिल्ली: देशात सध्या करोनाने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढ ही कमालीची आहे.मात्र त्यातच दुसरीकडे देशात पश्चिम बंगाल आणि इतर काही राज्यांमध्ये निवडणुकी साठी प्रचार सुरू आहेत, आणि हे कोरोना परिस्थिति साठी मुळीच अनुकूल नाहीये. दरम्यान,देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार आहे, अशी खरमरीत टिप्पणी काल मद्रास उच्च न्यायालयानं केली. उच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाची चांगलीच कानउघाडणी केली. निवडणूक असलेल्या राज्यांत हजारोंच्या सभा सुरू होत्या, तेव्हा तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होतात का, अशा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. यानंतर आता निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

२ मे रोजी चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर विजयी मिरवणुका काढू नका, अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणूक आयोगानं मिरवणुकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच आयोगाकडून आदेश काढण्यात येणार आहे.

You May Also Like