झी मराठीच्या मालिकांबाबत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय, तर होम मिनिस्टर Work From Home

मुंबई : देशात सध्या करोना रुग्ण संख्या वाढीचादर हा चिंतादायक आहे.  दरम्यान, गेल्याच वर्षी कोरोना व्हायरसमुळे काही महिने नाटक मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग थांबले होते. मात्र मनोरंजनसृष्टीला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मोठे नुकसान झाले होते. करोना जसजसा आटोक्यात येत होता असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झाली तेव्हा काही नियम आणि अटींसोबत शूटिंगला परवानगी देण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भाव वाढु लागला आणि पुन्हा गेल्या वर्षी प्रमाणे तशीच परिस्थिती यावर्षीही उदभवली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेतही विषाणू चा शिरकाव मालिकांच्या सेटवरही झालाय. अनेक कलाकारांना शूटिंग दरम्यान करोनाची लागण झाली. मात्र रसिकांचे मनोरंजासाठी मध्येच कुठेही मालिका बंद करण्याची वेळ येऊ नये करोनाचे सावट असूनही मालिकांचे शूटिंगही सुरुच आहेत. परिस्थिती आता हाता बाहेर जाऊ नये म्हणून मालिकांचे चित्रिकरण आता महाराष्ट्राबाहेर होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सगळ्यात आधी स्टार प्रवाह मालिकांचे शूटिंग महाराष्ट्राबाहेर होणार आहेत. त्यासाठी कलाकारांची कोरोना चाचणीही झाली आहे. स्टार प्रवाह पाठोपाठ आता झी मराठीने देखील असाच निर्णय घेतला आहे. पाहिले ना मी तुला (गोवा),अग्गंबाई सुनबाई (गोवा),येऊ कशी तशी मी नांदायला (दमण) माझा होशील ना – सिल्व्हासा, देवमाणूस (बेळगाव) चला हवा येऊ द्या (जयपूर),रात्रीस खेळ चाले 3 मालिकेच आधीच काही शूटिंग करुन झालेले आहे. त्यामुळे आगामी काळात एपिसोड टेलिकास्ट करण्यासाठी त्यांनी काही भागाचे शूटिंग झालेले असल्यामुळे अद्यापतरी चित्रिकरण लोकेशनविषयी निर्णय घेण्यात आलेला नाहीय. यात झी मराठी चॅनेलवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम होम मिनिस्टर पुन्हा वर्क फ्रॉम होमच सुरु करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like