पब्जीचा अपग्रेट व्हर्जन; निर्मात्यांनी केली पब्जी न्यू स्टेट अल्फाची घोषणा

मुंबई : ’पब्जी न्यू स्टेट’ पब्जी मोबाइल गेम सिक्वेलच्या क्लोज्ड अल्फा टेस्टिंगची घोषणा करण्यात आली आहे. हा सिक्वेल येणार असल्याची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती. बॅटल ग्राउंड्स मोबाइल इंडिया या गेमची प्री-रजिस्ट्रेशन्स खुली झाल्यानंतर काहीच दिवसांत पब्जीच्या क्लोज्ड अल्फा टेस्टिंगची घोषणा करण्यात आलीयं.

’पब्जीन्यू स्टेट’च्या क्लोज्ड अल्फा टेस्टिंगची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या गेमच्या डेव्हलपर्सनी प्रसिद्ध केला असून, हे टेस्टिंग लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केलीय. क्राफ्टॉन हे या गेमचे डेव्हलपर आहेत. हे टेस्टिंग पहिल्यांदा अमेरिकेत सुरू होणार असल्याचं या व्हिडिओवरून निश्चित झालं आहे. त्यानंतर युझर्सच्या प्रतिसादानुसार जगातल्या विविध प्रदेशांमध्ये हे टेस्टिंग खुलं करण्यात येणार आहे. हे अल्फाटेस्टिंग सुरुवातीच्या टप्प्यात तरी अँड्रॉइड युझर्ससाठीच उपलब्ध असेल. येत्या काही दिवसांत आयओएस अ‍ॅप सपोर्ट संदर्भातील माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी पात्र असलेल्या प्लेयर्सना पब्जी न्यू स्टेट हागेम ऑफिशियल रिलीजपूर्वी खेळायची संधी मिळणार आहे. त्यात काही बग्जआढळल्यास त्याची माहिती त्यांना देता येणार आहे. पब्जी न्यू स्टेट या गेमचीप्री-रजिस्ट्रेशन्स फेब्रुवारी2021पासून सुरू झाली आहेत. त्यानंतर गुगलप्ले स्टोअरवर एक कोटीहून अधिक जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केलं आहे.

You May Also Like

error: Content is protected !!