अन्…रडणारे बाळ चक्क डॉक्टरांच्या कुशीतच झोपले

धुळे : नवजात बालक आईचा स्पर्श ओळखते अन् कोणी घेतल्यानंतर रडणारे बाळ आईच्याच कुशीत शांत झोपते. आणि रडणारे बाळही आईच्या हाताचा स्पर्श होताच शांत होते. जेव्हा आईच्या कुशीतील रडणारे बाळ शांत होत नव्हते तेव्हा डॉक्टरांनी बाळाला हातात घेत त्याला गाणे म्हटले. अन् जोरात रडणारे हे बाळ काही मिनिटातच झोपी गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नवजात बालकाला गाणे म्हणून झोपविण्याचा हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यांच्या रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाचे वजन केवळ 900 ग्रॅम होते. त्या बाऴाला ऑक्सिजन देखील लावण्यात आलेला होता. बाळाला झोप येत नव्हती. पाचव्या दिवशी ऑक्सिजन काढल्यानंतर बाळाने आईचे दूधही प्यायले. यामुळे थोडी ताकद आल्याने बाळाचा आवाज निघाला आणि ते रडू लागले. बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिनय दरवडे यांनी बाळाला कुशीत घेत गाणे म्हटले असता जोDrरात रडणारे बाळ काही मिनीटातच झोपी गेल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

गाणे ऐकताच झोपले बाळ
बराच वेळ झाला तरी ते बाळ रडण्याचे थांबत नव्हते. आजूबाजूच्या बाळांनाही त्याचा त्रास जाणवू लागला होता. अशावेळी डॉ. दरवडे यांनी बाळाला केबिनमध्ये नेत हाताचा झोका करत त्याला शांत करण्यासाठी गाणी गायली. यानंतर बाळ शांतपणे गाणी ऐकता ऐकताच झोपून गेले.

You May Also Like