अनिल देशमुख अटकेच्या भीतीने गायब?; ‘ईडी’कडून शोधाशोध

मुंबई । माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. १०० कोटींचं प्रकरण चर्चेत आल्यानंतर ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तपास सुरू केला. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारी त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या छाप्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमु ‘अटकेच्या भीतीने गायब असल्याची माहिती समोर येत आहे.  अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

 

अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून वसुली करण्याचं टार्गेट पोलिसांना दिलं होतं, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीही एनआयए न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला होता. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या प्रकरणाचा सीबीआयकडूनही तपास केला जात आहे.

 

दरम्यान, गेल्या आठवड्यात ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, देशमुख यांनी प्रत्यक्ष हजर राहणं अशक्य असल्याचं कारण दिलं होतं. त्यानंतर रविवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील दोन निवासस्थानांवर छापे टाकले. काटोल आणि दुसऱ्या ठिकाणी असलेल्या घरांची झाडाझडती केल्यानंतर ईडीकडून देशमुख यांची चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता देशमुख यांचा फोन लागत नसल्याची माहिती समोर आली आहे.

You May Also Like