अनिल देशमुखांचे ईडीला पत्र; पत्रावर सर्वांच्या नजरा

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. परंतु, अनिल देशमुख पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीला एक पत्र पाठविले आहे. त्यात पत्रात म्हटले कि, आपले वाढते वय आणि करोनाचा धोका असे कारण सांगत चौकशीतून सूट मिळवण्याची मागणी केली आहे.

पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालय गाठले आहे. दरम्यान, तीन पानांच्या पत्रात अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात नोंदवलेल्या ईसीआयआरची प्रतही मागितली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची कोटी वसूलीचे आरोप केले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणात मनी लाँडरिंग चा गुन्हा दाखल करत संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहे.

ईडीने देशमुख काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी देशमुख यांचे स्वीय सहाय्यक आणि खाजगी सचिव दोघांना अटक केली होती.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेजला  आणि  टि्वटरवर  आम्हाला फॉलो करा…

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like