अनिल गोटेंनी टोचले स्वकियांचे कान, विरोधकांनाही लगावला टोला

धुळे | महाविकास आघाडी सरकार अन् विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. माजी आ. गोटे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय.

आघाडीत सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करीत आहेत. आघाडीत सहभागी असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले आहेत. कुणीही बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी स्विकारली आहे. ती आपली जबाबदारी ओळखूनच आनंदाने पार पाडली पाहिजे. असे सांगितले. याउलट अनेक नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवित आहेत, हे काही शोभादायक नाही.

 

आपले हसू होते हे कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे. हे कटू सत्य सांगण्याचे धाडस कुणीतरी करणे आवश्यक आहे. आपण आपला पक्ष सत्तेत आहे म्हणूनच आपण काय बोलतो? याला प्रसिध्दी माध्यमामध्ये वजन आहे किंवा किंमत आहे. सत्ता गेल्या नंतर आपली काय अवस्था होते हे आपण सर्वांनीच मागील पाच वर्षात अनुभवले आहे. असे गोटे यांनी म्हटलंय. तसेच गोटे यांनी भाजप नेत्यांचेंही कान टोचले आहेत.

You May Also Like