मास्कशिवाय पकडल्यास थेट 500 रुपये दंड; भारतीय रेल्वीची घोषणा

नवी दिल्ली: सध्या देशात करोना स्तिथी अतिशय बिकट झाली आहे. या संकटावर मात करण्यासठी करोना नियमांचे पालन करणे अत्यावशक आहे. सामाजिक अंतराचे पालन करणे,हात वारंवार धुणे. तसेच मास्क वापरणे, परंतु  वारंवार सांगूनही लोक सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे अशा गोष्टींकड दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेने आज मोठी घोषणा केलीय. जर आता कोणी रेल्वेच्या आत किंवा स्टेशनच्या आवारात मास्क परिधान करत नसेल तर त्यांच्यावर 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

दरम्यान, रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मास्क न घातल्याबद्दल दंड करण्याचे आदेश पुढील सहा महिने लागू राहतील. अनेक राज्य सरकारांनीही मास्क न घालण्याबाबत असे आदेश जारी केलेत. उत्तर प्रदेश सरकारने एक फर्मान जारी केलाय की, पहिल्यांदा मास्कशिवाय पकडल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल, तर दुसऱ्यांदा दंड 10 हजार रुपये असेल.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like